Thursday 5 June 2014

महाराष्ट्रातील प्रतिष्ठेची मॅक्सेल ऍवॉर्ड्स जाहीर

अमेरिकेतील प्रख्यात संशोधक-उदय़ोजक अशोक जोशी यांना जीवनगौरव; परशुराम एस. जाधव, रवि पंडित, किशोर पाटील, सीमा (वैदय़) मोदी, संजय गायकवाड, निर्मला कांदळगावकर आणि प्रदीप लोखंडे यांच्या कॉर्पोरेट एक्सलन्सचा उचित गौरव मुंबई, 1 मे, 2014, पायाभूत सुविधा, दूरदर्शी नेतृत्व, उदय़ोगाभिमुख आर्थिक धोरणे आणि कुशल मनुष्यबळ यांच्या बळावर महाराष्ट्र देशातील उदय़ोगजगतात सदैव आघाडीवर राहिलेला आहे. पण, महाराष्ट्रात कला-क्रीडा-संस्कृतीच्या बरोबरीने आंत्रप्रेन्युअरशिप, इनोव्हेशन आणि कॉर्पोरेट क्षेत्राकडे सुद्दा आपण गांभिर्याने बघणं आजच्या काळाची  गरज आहेउद्द्यचा महाराष्ट्र घडताना आपल्याकडे असलेल्या कर्तृत्वाचा आणि अनुभवाचा वारसा पुढिल पिढीला देणं आपल कर्तव्य नव्हे तर आपली  जवाबदारी आहे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या मॅक्सेल ऍवॉर्ड्स फॉर महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्सची घोषणा आज महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून करण्यात आली.

अमेरिकेतील प्रख्यात संशोधक-उदय़ोजक अशोक जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार असून उदय़ोजकतेच्या वेगवेगळय़ा क्षेत्रांतील परशुराम एस. जाधव, रवि पंडित, किशोर पाटील, सीमा (वैदय़) मोदी, संजय गायकवाड, निर्मला कांदळगावकर आणि प्रदीप लोखंडे यांच्या लखलखीत कामगिरीचा मॅक्सेल ऍर्वार्ड्स देऊन उचित गौरव केला जाणार आहे. 20 जून 2014 रोजी वरळी येथील नेहरू ऑडिटोरियममध्ये समारंभपूर्वक हे ऍवॉर्ड्स दिले जातील. मान्यवर निमंत्रितांबरोबरच मॅक्सेल अवॉर्डसचे सल्लागार जागतिक ख्यातीचे वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, लार्सन अँड टुब्रोचे सीईओ आणि संचालक वाय. एम. देवस्थळी, निवृत्त न्यायाधीश अरविंद सावंत, अमेरिकेतील उदय़ोगपती सुनील देशमुख आणि मॅक्सेल फाऊंडेशनचे संस्थापक-विश्वस्त कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होईल.

या पुरस्कारांनी तिसर्या वर्षात उदय़ोजकता आणि व्यवसायाच्या ठरीव साच्यांच्या पलीकडे जाऊन नवी क्षितिजे पादाक्रांत केली आहेत. उदय़ोजकता आणि व्यावसायिक यशाबरोबरच उदय़ोन्मुख उदय़ोजकांमधील वेगळय़ा वाटा धुंडाळणार्या मुशाफिरांचाही सन्मान व्हायला हवा आणि त्याचबरोबर सामाजिक उत्तरदायित्वाला वेगळा आयाम देऊ पाहणार्यांच्या पाठीवरही शाबासकीची थाप पडायला हवी, या विचाराने `रूरल रिलेशन्स'च्या प्रदीप लोखंडे यांना यंदा मॅक्सेल ऍवॉर्ड फॉर सोशल आंत्रप्रेन्युअरशिप या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सेंटर फॉर आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट (एमसीईडी) या रौप्य महोत्सवात पदार्पण केलेल्या, राज्य सरकारच्या संस्थेने गेल्या 25 वर्षांत जवळपास 10 लाख तरुणांना तांत्रिक, व्यवस्थापकीय आणि उदय़ोजकतेचा मंत्र देऊन राज्याच्या औदय़ोगिक विकासात जी मौलिक कामगिरी केली आहे, त्याबद्दल त्या संस्थेचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

मॅक्सेल ऍवॉर्ड्स 2014चे मानकरी पुढीलप्रमाणे

1.  मॅक्सेल अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशिप
श्री. परशुराम एस. जाधव (बापूसाहेब)
चेअरमन आणि कार्यकारी संचालक, सरोज ग्रुप ऑफ कंपनीज

बापूसाहेबांची जीवनकहाणी ही एका अभावग्रस्ताची थक्क करून सोडणारी कहाणी आहे. गरिबीने इयत्ता चौथीतच त्यांना शिक्षणाचा मार्ग सोडावा लागला आणि वडिलांच्या पश्चात घर चालवण्याची जबाबदारी घ्यावी लागली. मिळेल ते काम करता करता मालकाने त्यांना फौंड्रीत आपला सहाय्यक म्हणून नेमले आणि मेहनत, प्रामाणिकपणा आणि प्रयोगशीलता यांच्या मिलाफातूनच त्यांची स्वतःची फौंड्री उभारली आणि त्यातून सरोज ग्रुप ऑफ कंपनीजची पायाभरणी झाली. आज सिलिंडर हेड्सच्या निर्मितीत `सरोज आयर्न'ने आंतरराष्ट्रीय लौकिक कमावला आहे आणि आयएसओ 9001:2008 प्राप्त केले आहे. बापूसाहेबांना आजवर अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. `कोल्हापूर भूषण पुरस्कार', भारतीय आयकर विभागातर्फे देण्यात आलेला प्रामाणिक करदाता पुरस्कार', 2000 साली प्राप्त झालेला `जेम ऑफ न्यू मिलेनियम पुरस्कार', `एफ आय फौंडेशन ऍवार्ड' आणि `इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फौंड्रीमेन'च्या वतीने प्राप्त झालेला बेस्ट फौंड्रीमन  ऍवार्ड' हे पुरस्कार म्हणजे त्या पुरस्कारांचाच गौरव मानावा लागेल.

2.  मॅक्सेल ऍवॉर्ड फॉर एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशिप
श्री. रवि पंडित, चेअरमन आणि सीईओ, केपीआयटी टेक्नॉलॉजीज लि. आणि
श्री. किशोर पाटील, को-फाऊंडर, सीईओ आणि एमडी. केपीआयटी टेक्नॉलॉजीज लि.

आजचं जग हे माहिती तंत्रज्ञानाचं जग आहे. श्री. रवि पंडित यांच्या केपीआयटीने स्थापनेपासूनच या आधुनिक जगाच्या गरजा आणि मागण्यांशी घट्ट नातं जुळवलं आहे. सुवर्णपदक विजेते चार्टर्ड अकाउंटन्ट आणि आयसीडब्ल्यूएचे सदस्य असणार्या रवि पंडित यांनी कंपनीची धोरणं आणि वाटचाल यात नेहमीच दूरदृष्टी दाखवली आहे. म्हणूनच कंपनीच्या ग्राहकवर्गात आज 16 देशांचा समावेश आहे.केपीआयटी'ची खासियत म्हणजे तिचा ग्लोबल दृष्टीकोन आणि सर्वोत्तमतेचा ध्यास. त्यामुळेच आज जगाच्या बाजारात अग्रस्थानी असलेल्या या कंपनीने 2012-2013 या वर्षात 41 कोटी डॉलर्सचा महसूल मिळवला आहे. त्याचं मोठं श्रेय श्री. किशोर पाटील यांच्याकडे जातं. चार्टर्ड अकौंटंट आणि कॉस्ट अड वर्कस अकौंटंट अशा दुहेरी पदव्या घेतलेल्या किशोर पाटील यांचा, आंतरराष्ट्रीय स्तरावरची मोठय़ा नफ्याची ऑपरेशन्स, समर्थ कंपन्यांत होणारे लाभदायक करारमदार  आणि कंपन्यांचे घडणारे विलीनीकरण यात हातखंडा आहे. `केपीआयटी' मध्ये त्यांनी आपल्या सहकार्यांच्या सहयोगाने आतापर्यंत तब्बल 50 पेटंटस मिळविली आहेत.  Top 16 Entrepreneurs in India' हा पुरस्कार अर्नेस्ट अड यंग'च्या वतीने तर  Top 50 CEO's of 2013' हा सन्मान आंत्रप्रेन्युअर मासिका'तर्फे त्यांना देण्यात आला आहे. मोठय़ा प्रतिष्ठेचा `गोल्डन लोटस' हा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.

3.  मॅक्सेल अवॉर्ड फॉर - एक्सलन्स इन बिझिनेस लीडरशिप
सीमा (वैद्य) मोदी, व्यवस्थापकीय संचालक, हाईन्झ इंडिया

भारतीय बाजारपेठेतील महाब्रँड्सच्या महायुद्धातील एक विख्यात धुरंधर म्हणजे श्रीमती सीमा वैद्य मोदी. असामान्य कौशल्य, दूरदृष्टी, नेमकी व्यूहरचना, प्रतिभाशाली आणि ठाव घेणारी जाहिरात मोहीम या गुणांच्या बळावर आजवर असंख्य लढाया त्यांनी बघताबघता जिंकल्या आहेत. या गुणांमुळेच त्या आज हाईन्झच्या पहिल्या स्त्री-संचालक झाल्या आहेत! 2012 मध्ये एमडी झाल्यावर त्यांनी ग्राहकाची मानसिकता नेमकेपणाने ओळखण्याचे अपार कौशल्य जसे दाखवले आहे तसेच उद्योजकतेतील सर्वोत्तम गुणदर्शनही घडवले आहे. `एच. जे. हाईन्झ  चेअरमन अवार्ड' 2010हा मानाचा पुरस्कार जसा त्यांना प्राप्त झाला तसाच  भारतातल्या `सर्वाधिक प्रभावशाली स्त्रियां'च्या सन्मानमालेत त्या चोविसाव्या स्थानावर विराजमानही झाल्या आहेत !

4.  मॅक्सेल अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन इनोव्हेशन्स
श्री. संजय गायकवाड, बी.. ( केमिकल ), एम.बी.., व्यवस्थापकीय संचालक, व्हॅल्युएबल ग्रूप

मनोरंजनाच्या जगाला पायरसीच्या संकटातून सोडवणारा तरुण केमिकल इंजीनियर म्हणजे मुंबईचे संजय गायकवाड! मनोरंजन तंत्रज्ञानाचे जग स्वतःच्या नाविन्यपूर्ण शोधांनी बदलवणारी संजय यांची व्हॅल्यूएबल ग्रुप या अत्यंत डायनॅमिक कंपनी आहे. करिअरच्या सुरुवातीच्या झी' पर्वापासूनच त्यांनी संपर्क, सुधारणा, गती-प्रगती आणि व्यवसाय या सगळ्याच्या व्याख्या बदलल्या होत्या. `प्ले विन' ही ऑनलाइन लॉटरी हे त्यांचंच अपत्य. प्रसार माध्यमे, शिक्षण, मनोरंजन आणि सेवाक्षेत्रातली पस्तीस पेटंटस त्यांच्या नावावर आहेत. पायरसीला यशस्वी आळा घालणारे यूफओ मुव्हीज हे बिझनेस मॉडेलही त्यांनी विकसित केलं आहे. `टेक्नोप्रेन्यूअर ऑफ इयर' हा सिंगापूरचा सन्मान, `मेरिको फौंडेशन'तर्फे दिला जाणारा `इनोव्हेशन ऑफ इयर' हा बहुमान आदी अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.

5.  मॅक्सेल अवॉर्ड फॉर इमर्जिंग एक्सलन्स
श्रीमती निर्मला गिरीश कांदळगांवकर, अध्यक्ष, विवम एसडब्ल्यूएम प्रा. लि.

आपल्या राहत्या ग्रहाचा म्हणजेच पृथ्वीचा पर्यावरणीय तोल ढासळणार नाही यासाठी आटोकाट काळजी घेणं हे आज आपल्यापुढील सर्वात प्रबळ आव्हान आहे. श्रीमती निर्मला गिरीश कांदळगांवकर ही एक सेवाव्रती स्त्री आज कार्बनच्या जीवघेण्या विळख्यातून भारताला मुक्त करण्यासाठी अविरत आणि अथक प्रयत्न करते आहे. यासाठी त्या विवम एस डब्ल्यू एम (सॉलीड वेस्ट मॅनेजमेन्ट) प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची यंत्रणा त्यासाठी राबवत आहेत. कम्पोस्टिंग, व्हर्मी कम्पोस्टिंग, यांत्रिक कंपोस्ट आणि बायोगॅस निर्मितीसाठी परिणामकारक आणि प्रभावी प्रक्रिया या कंपनीतर्फे निर्माण केल्या जातात. शहरांच्या समतोल आणि निरंतर विकासासाठी उपयुक्त ठरणारी टेक्नोलॉजी निर्माण करण्यासाठीसुद्धा ही कंपनी कार्यरत आहे. देशभरात कार्यरत असलेल्या विवमचे आगामी लक्ष्य कचर्यापासून वीजनिर्मितीचे आहे.

6.  मॅक्सेल अवॉर्ड फॉर सोशल आंत्रप्रेन्युअरशिप
प्रदीप लोखंडे, संस्थापक, रूरल रिलेशन्स

ग्रामीण भागात राहाणारे आणि ग्रामीण महाराष्ट्राचा अभ्यास करू पाहणारे यांना एकमेकांशी जोडण्याचं काम करणारा सेतू म्हणजे प्रदीप लोखंडे. ग्रामीण भारताशी संबधित माहितीचा एक महाकोशच गेल्या काही वर्षांत लोखंडे यांनी निर्माण केला आहे. लोखंडे यांच्या `रुरल रिलेशन्स' या संस्थेकडे भारताच्या अनेकविध राज्यातील ग्रामीण आणि अगदी दुर्गम भागातीलही जनजीवनाची,— व्यापार, उद्योग-व्यवसाय, शिक्षण आदींची सचित्र माहिती अद्ययावत स्वरूपात तयार आहे. या डाटाबेसचा उपयोग व्यापारीवर्गाला, सामाजिक-सांस्कृतिक संशोधक आणि अभ्यासकांना, कॉर्पोरेट कंपन्यांना, व्यक्तींना, राजकारणी नेतृत्वाला मोठय़ा प्रमाणावर होतो आहे. त्यांनी गावागावात आणि ग्रामीण भागातील शाळांतून संगणक क्रांती घडवून आणली आहे. सामाजिक उद्यमशीलतेचा आणि उद्योजकतेचा एक नवा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. त्यांना प्राप्त होणारा आजचा पुरस्कार हे त्यांचे ऋण व्यक्त करणारा आहे.

7.   मॅक्सेल अवॉर्ड ऑफ स्पेशल रेकग्निशन
महाराष्ट्र सेंटर फॉर आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट (MCED)

औद्योगिक विकासात गेल्या 25 वर्षांत आपल्या राज्याने इतर राज्यांवर मोठी मात केली आहे. देशाची औद्योगिक राजधानी म्हणून लौकिक संपादन करण्यात `महाराष्ट्र सेंटर फॉर आत्रप्रेन्यूअरशिप डेव्हलपमेन्ट' या शक्तिशाली संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. संस्थेच्या 1988मधील स्थापनेपासूनच संस्थेने नवे उद्योजक घडवण्याचे कार्य कोणत्याही विद्यापीठांपेक्षा अधिक सकस प्रकारे केले आहे. तरुणांमध्ये उद्योजकतेचे भान निर्माण करणे, उद्योजक होण्याची इच्छा असलेल्यांना सर्व प्रकारची मदत करणे, त्यांना व्यावसायिकतेचे आणि संपर्क-संवादाचे कौशल्य प्राप्त करून देणे यावर एमसीईडीचा भर राहात आला आहे. या संस्थेने घडवलेले अनेक तरूण आज आपापल्या व्यवसायात कमालीचे यश मिळवत आहेत. सहकार, शेती, विद्युत उपकरणे, ऑटोमोबाइल्स, डेअरी व्यवसाय अशा क्षेत्रांत आज मोठय़ा आत्मविश्वासाने नवे उद्योजक उंच भरारी घेत आहेत. या संस्थेचा गौरव हा महाराष्ट्राच्या आजच्या आणि उद्याच्या अग्रेसरत्वाचाच गौरव आहे.

8.  मॅक्सेल जीवनगौरव पुरस्कार
डॉअशोक  जोशीप्रेसिडेंट, केरामाटक, यूएस
संशोधक, गुंतवणूकदार, तंत्रज्ञान-उदय़ोजक, दानशूर परदेशस्थ भारतीय

`केरामाटक' या उटाहस्थित टेक्नोलॉजी कंपनीच्या अध्यक्षपदी विराजमान असलेले डॉ. अशोक जोशी म्हणजे बुद्धिमत्ता, संशोधनशीलता, सातत्यशीलता आणि अप्रतिम कौशल्य यांचे एक आत्यंतिक यशस्वी कॉम्बिनेशन! टेक्नोलॉजीमधील एक आदर्श व्यक्तिमत्व आणि इलेक्ट्रोकेमिकल क्षेत्रातील एक विलक्षण नेतृत्व असा त्यांचा उचित गौरव वारंवार होतो. त्यांच्या नावावर अमेरिकेत 100 पेटंटस असून अधिक 40 पेटंटस मान्यतेच्या प्रक्रियेत आहेत. त्यांची चार संशोधने आता व्यावसायिक पातळीवर स्वीकारण्यात आली आहेत. त्यांनी आजवर सहा टेक्नोलॉजी कंपन्यांची स्थापना केली असून त्यातील तीन कंपन्या त्यांनी अत्यंत यशस्वीपणे विकल्या आहेत. भारतातली पहिली बटणसेल बॅटरी विकसित करून कारकिर्दीचा शुभारंभ करणार्या जोशींनी त्यासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला. त्यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि धर्मादाय संस्थांना त्यांच्या कार्यासाठी लक्षणीय आर्थिक मदतही केली आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभलेले आहेत.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.