मुंबई दिनांक: 20 जुन 2014 : “महाराष्ट्रातील
माणसं नको तेवढी
चिकित्सक आहेत, काही नवीन
करण्याचा प्रयत्न झाला की
लगेच अनेक प्रकारच्या
शंका घेतल्या जातात.
वृत्तपत्रांतून रकानेच्या रकाने लिखाण
केलं जातं. ही
बदलाला, नवनिर्मितीला विरोध करणारी नकारात्मकता
घालवण्याची गरज आज
महाराष्ट्रात फार मोठी
आहे, मॅक्सेल पुरस्कार
हा समाजात सकारात्मक
दृष्टिकोन निर्माण करणारा, नवतेचा
पुरस्कार करणारा गौरवशाली उपक्रम
आहे”असे प्रतिपादन
माजी केंद्रीय कृषी
मंत्री शरद पवार
यांनी केले.
वरळी येथील नेहरू सेंटर येथे झालेल्या मॅक्सेल फाऊंडेशनच्या ‘मॅक्सेल महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्स अॅवॉर्डस्’ लोकनेते श्री. शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कोल्हापूरचे उद्योजक बापूसाहेब जाधव, केपीआयटीचे रवी पंडित आणि किशोर पाटील, सीमा वैद्य मोदी, व्हॅल्यूएबल ग्रुपचे संजय गायकवाड, ग्रामीण शिक्षणासाठी काम करणारे प्रदीप लोखंडे, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या निर्मला कांदळगावकर, एमसीईडी – महाराष्ट्र सेंटर फॉर आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट, औरंगाबाद आणि अमेरिकेतल्या केरा माटकचे अध्यक्ष अशोक जोशी या मान्यवरांचा मॅक्सेल पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.

कोणताही नवीन प्रकल्प
हाती घेतला की
टीका सहन करावी
लागते. महाराष्ट्राच्या राजकारणात गेली
पन्नास वर्षं वावरताना मलाही
अशी टीका सहन
करावी लागली आहे.
मी ती सहनही केली
असे पवार म्हणाले. यावेळी
दाभोळ मधील एन्रॉन
प्रकल्पाचे उदाहरण देताना पवार
म्हणाले की, महाराष्ट्राला
विजेची गरज होती.
या वीजनिर्मिातीसाठी सरकारी
तिजोरीतून पैसा जाऊ
नये म्हणून एन्रॉन
कंपनीशी बोलून दाभोळमध्ये वीज
प्रकल्प उभा केला.
परंतु, या बाबत
अतिरेकी टीका झाली.
त्यामुळे प्रकल्प चार वर्ष
बंद पडून पुन्हा
सुरू झाला. नवे
काही स्वीकारले जात
नाही याचा अनुभव
लवासाच्या माध्यमातून पुन्हा आला.
हा प्रकल्प साकारणाऱ्या
हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला प्रचंड विरोध
झाला. परंतु, आज
या प्रकल्पाला हजारो
कुटुंबं भेट देतात.
महाराष्ट्रात अशी ३०
ठिकाणे आहेत, जिथे असे
प्रकल्प साकारता येतील. पण
त्यासाठी नकारात्मक मानसिकता बदलण्याची
गरज आहे. शेतीच्या
क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने
विकसित करण्यात आलेल्या जीएम
बियाणांना विरोध होतो, परंतु,
याच बीजांपासून तयार
केलेल्या डाळी आणिण
तेल हजारो कोटी
रुपये मोजून आयात
केले जातात, असे
सांगून त्यांनी या विरोधातला
फोलपणा स्पष्ट केला. ज्यामुळे हवामान,
माती, आणिा मानवी
आरोग्यावर परिणाम होणार नाही, अशा संशोधनाला
विरोध होऊ नये,
असे मत त्यांनी
व्यक्त केले.
डॉ. अनिल काकोडकर
या कार्यक्रमात बोलतांना
म्हणाले की, “देशात
५० रीसर्च पार्क
बनवण्याची योजना अनेक वर्षांपूर्वी
आखली गेली आहे. प्रत्यक्षात
दोनच पार्क्सची निर्मिती
होऊ शकली. यातून
आपली संशोधनाची गती
लक्षात येते, चीनमध्ये अशी
३०० रीसर्च पार्क
कार्यरत आहेत, संशोधनाची स्पर्धा
जिंकायची असेल तर
त्यासाठी कुठल्या स्तराची तयारी
करावी लागेल याची
कल्पना करा. महाराष्ट्रातल्या
संशोधन करणाऱ्या संस्थांना
एकत्र आणण्याची आज
गरज आहे. त्यांचे
जाळे उभे करण्याची
गरज आहे. त्यांना
बळ दिलं
तरच ग्लोबल महाराष्ट्राचे
स्वप्न साकार होवू शकेल”
असे मतही त्यांनी
मांडले
त्या आधी मॅक्सेल
फाऊंडेशनचे संस्थापक ट्रस्टी नितीन
पोतदार यांनी मॅक्सेलची संकल्पना
विशद केली. ते म्हणाले
की, “मॅक्सेल हा
एक फक्त पुरस्कार
सोहळा नसून ती
महाराष्ट्राच्या तरूणांमध्ये उद्योजकता निर्माण करण्यासाठीची एक
चळवळ आहे!” महाराष्ट्राची ओळख ‘ग्लोबल’
व्हावी या साठी
त्यांनी ‘मॅक्स-महाराष्ट्र’ या डॉक्युमेंटचे
सादरीकरण केले. पुढे पोतदार
यांनी आपली काही
मते स्पष्ट स्वरुपात
नोंदवली. “ महाराष्ट्राची
पहिली ओळखं ही
सहकार-चळवळं! मात्र
सहकारक्षेत्रात गुजरातच्या ‘अमुल ने
मोठं नाव केलं,
त्यानंतर आले ते
मेडिकल आणि इंजिनिअरिंगची विनाअनुदान
कॉलेजेस, पण त्यांना
एका विशिष्ट मर्यादेपेक्षा
जास्त यश मिळू
शकलं नाही, किंबहुना
आपण तसे प्रयत्नच
केले नाही. १९९० सालानंतर
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत परदेशी
गुंतवणुक आली, आपण
एक प्रगत राज्य
म्हणून ओळखलो जाऊ लागलो,
पण दुर्दैव असं
की त्यातून महाराष्ट्राची
जागतिक ओळखं निर्माण
झाली नाही. त्या
मानाने हैद्राबादला त्यावेळचे मुख्यमंत्री
चंद्राबाबु नायडुंनी मोठे काम
केले. अर्थात अजूनही वेळ
गेलेली नाही. जर
महाराष्ट्राने (1) मिडिया अॅण्ड एन्टरटेनमेंट,
(2) मॅनेजमेंट-एज्युकेशन व रिसर्च
अणि (3) इन्फ्रास्ट्रक्चरला
लागणारी अवजड मशिनरी या क्षेत्रात काम
केलं तर आपण महाराष्ट्राला
जागतिक स्तरावर
नेऊ शकतो. .
एन्टरटेनमेंट म्हणजे नुसत सिनेमा नसुन त्यात आता गेमिंग़ आणि अॅ निमेशन हे सुद्दा स्वतंत्र्य उद्दोग म्हणुन उदयाला आले आहेत. महाराष्ट्रात जर आपण जागतिक किर्तीचे स्ट्युडिओज म्हणेज 20 सेंचुरी फॉक्स, डिस्ने, एमजीएम, सोनी आणु शकलो तर महाराष्ट्राच्या मिडिआ इंडस्ट्रीला जागतिक पातळीवर स्वतंत्र ओळखं निर्माण मिळू शकेल. त्याचप्रमाणे उच्चतम मॅनेजमेंट-एज्युकेशन व रिसर्च साठी जागतिक किर्ती असलेल्या संस्था म्हणजे हारवर्ड, स्टंफोर्ड, एमआयटी, लंडन स्कुल ऑफ एकोनॉमिक्स यांना आपण महाराष्ट्रात आणु शकलो तर महाराष्ट्राच्या मध्यम वर्गातल्या मुलांना देखिल उच्च दर्जाच शिक्षणं मिळु शकेल आणि मराठी तरूणांना जागतिक बाजारपेठेत निर्णायक भूमिकेत काम करता येईल. देशाला आज बेस्ट आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चची गरज आहे. त्यासाठी आपण जगातील मोठ-मोठ्या कंपन्याना जर महाराष्ट्रात आणु शकलो तर महाराष्ट्र या क्षेत्रात देखील आपला ठसा उमटवू शकतो”, असे मत पोतदार यांनी व्यक्त केले.

हा धागा पकडून
“अमेरिकेची एकेकाळी ओळख तेथील
मोटारी आणि
कारखाने होती, पण आज
त्यांची ओळख मॅकडोनाल्ड
आणिे केंटुकी ही
आहे, विकासाची व्याख्या
बदलतेय परंतु, विकास म्हणजे
केवळ जीडीपी नाही.
तर त्याला सामाजिक
आणिच सांस्कृतिक आशयही
आहे आणि मॅक्सेल
फाऊंडेशनने पुरस्कार देताना हा
आशय जपला आहे,'
असे मत ज्येष्ठ
पत्रकार कुमार केतकर यांनी
व्यक्त केले. या कार्यक्रमाला
फार मोठ्या संख्येने
उद्योजक , बिझीनेस लिडर्स आणि
समाजातील प्रतिष्टित मंडळी आवर्जुन
उपस्थित होती. कार्यक्रम
एलआयसी ने प्रायोजित
केला होता.