Monday 18 May 2015

‘मेक-इन-महाराष्ट्रासाठी’ तरुण उद्दोजाकांची एक नवीन पिढी तयार होण गरजेच

मुंबई दिनांक १६ मे २०१५ :   महाराष्ट्राच्या उद्योग, कॉर्पोरेट, इन्होवेशन व समाजसेवा जगात उत्तुंग भरारी घेऊन, आपल्या कर्तृत्वाच्या याशाचा झेंडासातासमुद्रापार फडकवणाऱ्यामहाराष्ट्रातील यशस्वी उद्योजकांना'मॅक्सेल फाऊंडेशन'च्या वतीने देण्यात येणाऱ्या 'मॅक्सेल – म्हणजे महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलंस अवार्डस पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले.  महाराष्ट्रात उद्योजकतेबाबत जागरुकता निर्माण करणे,  पुढील पिढीला त्यांची स्वप्नवास्तवात आणण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांच्यामधील क्षमतांना कार्यरुप देणे हा मॅक्सेल अवार्डमागचा उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ मंत्री सुभाष देसाई उद्योग विभाग व शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते.  या सोहळ्याला उपस्थित जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी या उद्योजकांना सतत नाविन्यपूर्ण संशोधन करीत राहाण्याचा कानमंत्र दिला. तर मराठी माणसाने स्वतःचे ब्रँडिंग करायला पाहिजे,असे अॅडगुरू भरत दाभोळकर यांनी या सोहळ्याला उपस्थित असलेलेल्या उद्योग क्षेत्रातील मराठी मंडळींना सांगितले.


'मॅक्सेलचे हे चौथे वर्ष आहे. यावर्षीचा 'एक्सलन्स इन एन्टरप्रेन्युअरशिप पुरस्कार' खाडे ऑफशोअर इंजिनीअरिंगचे एमडी अशोक खाडे, 'एक्सलन्स इन बिझनेस लिडरशीप पुरस्कार'एचडीएफसीचे अॅसेट मनेजमेंट कंपनीचे एमडी मिलिंद बर्वे, 'एक्सलन्स इन इमर्जिंग एक्सलन्स पुरस्कार मनी बी इन्स्टिट्यूटच्या डायरक्टेर शिवानी दाणी, 'एक्सलन्स इन इनोव्हेशन पुरस्कार' प्रिसिजन आटोमेशन अँड रोबोटिक्स इंडियाचे एमडी मंगेश काळे, 'यंग एंटरप्रेन्युअर पुरस्कार' वर्देची मोटारसायकल्सचे एमडी अक्षय वर्दे, 'एक्सलन्स इन सोशल एन्टरप्रेन्युअरशिप पुरस्कार' अन्नपूर्णा परिवार संस्थेच्या संस्थापिका डॉ. मेधा (पुरव) सामंत आणि 'लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार' आर्च ग्रुप कन्सल्टंटचे संस्थापक व व्यवस्थापकीय भागीदार आर्किटेक्ट अशोक कोरगावकर यांना प्रदान करण्यात आला.


वरळीतील नेहरू सेंटरमध्ये शनिवारी रात्री आयोजित एका शानदार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सोहळ्याला जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ व पद्मभूषण पुरस्कार विजेते डॉ. रघुनाथ माशेलकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षण मंत्री विनोद तावडे, केरळ हायकोर्टाचे निवृत्त न्या. अरविंद सावंत, मॅक्सेल फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त नितीन पोतदार, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, सिंधुताई सकपाळ, भरत दाभोळकर यांच्यासह व्यावसायिक जगतातील अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती.

‘मेक-इन-महाराष्ट्रासाठी’ तरुण उद्दोजकांची एक नवीन पिढी तयार होण गरजेच आहे – नितीन पोतदार

पुढील पिढीने ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेचा पुरेपूर लाभ घ्यावा यासाठी एक – ‘इको सिस्टीम’निर्माण करणे हे मॅक्सेल फाऊंडेशनचे व्हिजन आहे. तरुणांनी क्रिएटीव्ह रहावे व उत्पादक मालमत्ता निर्माण करावी यासाठी हा प्रयत्न आहे. याकरताच मॅक्सेलने खाली दिलेल्या तीन कलमी अजेंड्याची घोषणा श्री. नितीन पोतदारांनी त्याच्या प्रास्ताविक भाषणात केली ती अशी :
1) या करता सुरवात म्हणून मॅक्सेल फाऊंडेशनने मागील वर्षी मॅक्सप्लोअर - एक्सप्लोरींग आंत्रेपुरनरशिप म्हणजेच उद्योजकतेचा शोध घेणे हा उपक्रम मुंबई विद्यापिठातील लाईफ लॉंग लर्निंग ॲन्ड एक्सटेंशन यांच्या सहकार्याने अंमलात आणला. यामुळे विद्यार्थ्यांना आत्मपरिक्षण करणे, कल्पकता दाखवणे आणि उद्योगाच्या बाबतीतील आयडिया प्रत्यक्षात आणणे यात मदत झाली.
पहिल्या वर्षातच मुंबई व ठाणे जिल्ह्यातील ३० कॉलेजमधील १२०० विद्यार्थ्यांपर्यंत मॅक्सप्लोअर उपक्रम पोचू शकला. यावर्षी मॅक्सेलने वेलिंगकर यांच्या वुई स्कूलबरोबर टाय-अप केलेले आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर विस्तार करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. पूणे, नासिक,नागपूर, अहमदनगर, कोल्हापूर आणि रत्नागिरी, कोकण विभाग अशा महाराष्ट्राच्या इतर भागातही आम्ही हा उपक्रम नेऊ. महत्वाच्या कॉलेजेसमधील ५००० विद्यार्थ्यांपर्यंत पोचणे हे उद्दीष्ट आहे.  

2) उद्दोजाकातेसाठे अभ्यासक्रम :  उद्योजकतेबाबत मॅक्सेल फाऊंडेशन एक विस्तृत अभ्यासक्रम तयार करत आहे. शाळा व महाविद्यालयात उद्योजकतेवर जी पाठ्यपुस्तके आहेत त्यात याचा समावेश होऊ शकेल. इतिहास, भूगोल गणित आणि विज्ञान यासारखाच उद्योजकता हाही एक विषय शालेय अभ्यासक्रमात सुरु करणे हे एक क्रांतिकारी पाऊल होईल व भारतात अशा प्रकारचे हे पहिलेच पाऊल असेल.  विद्यार्थ्यांना कल्पकता दाखवणे व उत्पादक मालमत्तेचे निर्माण करणे यात यामुळे भाग घेता येईल.

3) उद्योग खात्याबरोबर उपक्रम: शिक्षण व्यवस्था व उद्योगजगत यांचा एकमेकांबरोबर निकटचा संबंध असणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यभर इंटर्नशिप प्रोग्रॅम सुरु होण गरजेच आहे. यामुळे बहुविध चांगल्या गोष्टी घडतील; विद्यार्थ्यांना थेट कौशल्य शिकण्याची संधी मिळेल, त्यांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि उद्योगजगताला प्रशिक्षित/कौशल्यपूर्ण मनुष्यबळ मिळेल. मॅक्सेल फाऊंडेशन उद्योग खात्याच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या इंडस्ट्रीयल लॉ अंतर्गत इंटर्नशिप ॲक्टचा कायदा तयार करण्यास ऊत्सुक आहे.

'मॅक्सप्लोअर योजना'नेत नवीन तरुण उद्दोजक व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सर्व प्रस्थापित उद्योजकांनी त्यांच्या कारखान्यात युवकांना इंटर्नशीप देण्याची सूचना पोतदार यांनी केली. 'राज्यात दहा कोटी लोकसंख्या आहे. पाच जणांचे एक कुटुंब गृहीत धरले, तर एक हजार कुटुंबाच्या मागे एक नवीन उद्योगती तयार करायला आम्हाला यश मिळाले, तर भविष्यात २० हजार उद्योजक तयार होतील. त्यांनी ५० जणांना रोजगार दिला, तर दहा लाख नोकऱ्या उपलब्ध होतील,' असे श्री पोतदार म्हणाले.


भारतीयांमध्ये प्रचंड हुशारी - डॉ. रघुनाथ माशेलकर 

डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आपल्या भाषणात देशाच्या औद्योगिक प्रगतीचा आढावा घेतला. भारताच्या मंगळयान मोहिमचे उदाहरण देऊन ते म्हणाले, 'भारतीयांमध्ये प्रचंड हुशारी आहे. अमेरिकेपेक्षा दहा पट कमी खर्चात भारताने मंगळयान मोहीम फत्ते केली.' तर साफ्टवेअरमधील आयसीचे म्हणजे इंटिग्रेटेड सर्किटचे उदाहरण देताना, आयसीमुळे संपूर्ण क्रांती झाली. आता आयसी म्हणजे इंडिया व चीन असे समीकरण झाले आहे. हे दोन देश जगाचे नेतृत्व करतील,लोकांना परवडणारी उत्पादने हेच दोन देश तयार करतील. त्याचवेळी महाराष्ट्रानेही उद्योगात प्रगती केली पाहिजे. त्यासाठी आपण मनोवृत्तीतही बदल केला पाहिजे, असे ते म्हणाले.

व्यावहारिक शिक्षण देण गरजेच - शिक्षण मंत्री विनोद तावडे  

महाराष्ट्रातील शिक्षणपध्दतीत व शिक्षणात आमुलाग्र परिवर्तनाची आवश्यकता आहे. उद्योजकेतची सुरवात तळापासून व शाळेतूनच व्हायला हवी, तो केवळ माहाविदयालयीन शिक्षणातील एक विषय असू नये. शिक्षणात गुंतवणूक ही भविष्यकाळासाठी केलेली गुंतवणूक आहे आणि आमचे शासन हे शिक्षणपध्दतीत पूर्ण बदल आणण्यासाठी कटीबध्द आहे. मॅक्सप्लोअर सारखे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेसमध्ये नेले पाहिजेत असे शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले.

तरुणासाठी महाराष्ट्रात व्हेंचर कॅपिटल फंड – उद्दोग मंत्री शुभाष देसाई  

उद्योग खात्याचे मंत्री श्री सुभाष देसाई, यांनी या प्रसंगी म्हणाले की महाराष्ट्रात शिक्षीत व इंग्लिश बोलू शकणारे मनुष्यबळ आहे त्यामुळे जागतिक कंपन्यांना या राज्यात येण्याची इच्छा असते. उद्योजकतेचे महत्वा ओळखून महाराष्ट्र शासनाने सिडबीच्या सहकार्याने २०० कोटी रुपयांचा व्हेंचर कॅपिटल फंड उभारण्याचे योजले आहे. अतिलघु, लघु व मध्यम आकाराचे उद्योग यांना भांडवलाची नेहमीच अडचण असते. या व्हेंचर कॅपिटल फंडातून त्यांना सुलभ वित्त पुरवठा करण्यात येईल.

स्वतःचे ब्रँडिंग करा – भारत दाभोळकर

मराठी माणसाकडे सर्व गोष्टी आहेत. पण, मराठी माणसे स्वतःचे ब्रँडिंग करण्यात कमी पडतात, हे सांगताना अॅडगुरू भरत दाभोळकर यांनी ब्रँडिंग व जाहिरातीवर एक सादरीकरण केले. अमूलच्या जाहिरातीमागील यशाचे गमक त्यांनी समजावून सांगितले. जाहिरात यशस्वी करण्याचे तंत्र सांगितले. मराठी माणसाने स्वतःचे ब्रँडिंग करण्याचा मंत्र उपस्थितांना दिला.



शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका - अशोक खाडे 

या पुरस्कारानंतर मनोगत व्यक्त करताना, 'खाडे ऑफशोअर'चे अशोक खाडे यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका. तुम्हाला पुढे खूप काही साध्य करायचे आहे. जे गेले ते ओझे होते, राहिले ते माझे आहे हे लक्षात ठेवा,' असा सल्ला त्यांनी दिला.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.